। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने महिला आंदोलनाचा आवाज हरपला. दक्षिण आशियातील स्त्रीवादी आंदोलनाला पुढे नेण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कमला भसीन यांचा जन्म 24 एप्रिल 1946 रोजी झाला होता. एक स्त्रीवादी कार्यकर्ती, कवयित्री, लेखिका अशी त्यांची ओळख होती. कमला भसीन यांनी 1970 पासून महिलांसाठी काम कऱण्यास सुरुवात केली होती. लैंगिक भेदभाव, शिक्षण, मानव विकास आणि माध्यम यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे.
स्त्रीवादी लेखिक कमला भसीन कालवश
