शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| माणगाव | प्रतिनिधी |
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू झाला आहे. या प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा माणगाव येथे सु.ना. शिपुरकर इंग्रजी माध्यम शाळेत मंगळवार, दि. 16 जानेवारीपासून सुरू झाला आहे.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कसे देता येईल, त्यांच्या सुप्त गुणांचा विकास कसा करता येईल, तंत्रज्ञानाचा वापर, सर्जनशील विचार करणारे विद्यार्थी जबाबदार नागरिक कसे घडतील, शिक्षक, पालक व समाजाची भूमिका इत्यादीबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन असे या प्रशिक्षणाचे स्वरूप आहे. विविध विषयांवर चर्चा, गट कार्य, जिज्ञासा जागृती, शंका समाधान आदीबाबतचे मार्गदर्शन प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणास माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, संचालक नितीन बामुगडे, नरेंद्र गायकवाड, अशोकदादा साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एम. जाधव आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
ग.शि.अ. सुनिता खरात व विस्तार अधिकारी सुरेखा ताबंट, सुलभक सुधीर निकम, धनराज बंडगर, शृंगारी पाटील, प्रशिक्षण समन्वयक संतोष बेंदुगडे, स्वाती भुस्कुटे यांच्या नियोजन व प्रशिक्षणातून प्रशिक्षण यशस्वी होत आहे. या प्रशिक्षणात 712 प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.







