उरणच्या समृध्द वारी परंपरेचे पाचवे वर्ष

। उरण । वार्ताहर ।

देशातल्या वारकरी परंपरेचा परमोच्च बिंदू असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या नवीन शेवा येथून निघणार्‍या वारीचे हे पाचवे वर्ष. या वारीची सुरुवात गुरुवारपासून झाली. नवीन शेवा येथून निघालेल्या वारीची गुरुवारी नगरप्रदक्षिणा पार पडली.

या नगरप्रदक्षिणेत शेकडोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. याच रात्री नवीन शेवा येथे गोविंदमहाराज यांचे कीर्तन पार पडले. रात्रीचं जागर भजनही सादर झालं. शुक्रवारी आळंदी येथे अनंत महाराज पारगावकर धर्मशाळेत दोन दिवसांच्या मुक्कामात संस्थांच्या विद्यमाने कीर्तन सादर होईल. तर शनिवारी गोविंद महाराज यांचे कीर्तन पार पडेल. रविवारचा वारीचा मुक्काम हा पुणे दिघीकॅम्प छावणी येथे असेल. तिथे कीर्तन सेवेचे मानकरी नितीन महाराज म्हात्रे हे असतील. वारीचा सोमवारचा मुक्काम हडपसर येथे असून, तिथे कीर्तनसेवा सातारा येथील कीर्तनकार सानिका महाराज तसेच राजेंद्र महाराज केंद्रे हे पार पाडतील. वारीचा मंगळवारचा मुक्काम हा वडकी सासवड येथे स्वामी मंदिरात होणार आहे. तिथे नामदेव महाराज जायेभाये हे पोथीवाचन करणार आहेत तर गणेश महाराज आणि नामदेव महाराज यांची कीर्तन सेवा पार पडेल.

वारीचा बुधवारचा मुक्काम सासवड दिवे येथे नामदेव महाराज झेंडे यांच्या निवासी असणार आहे. इथली कीर्तनसेवा विवेक महाराज शिरसाठ हे सादर करतील. गुरुवारी वारीचे प्रस्थान जेजुरी येथे बेलसर फाटा येथे असणार आहे. येथे सातारा येथील सानिका महाराज यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे. शुक्रवारी वारीचे प्रस्थान हे वाल्हे कामठवाडी येथे असणार आहे. दिघोडे येथील अक्षय महाराज कोळी यांची कीर्तन सेवा होणार आहे. शनिवार आणि रविवारी वारीचा मुक्काम लोणंद येथे असेल. या दोन मुक्कमात सानिका महाराज आणि राजेंद्र महाराज केंद्रे यांची कीर्तनं होतील.

तिथे पहिले उभं रिंगण पार पडल्यावर सोमवारी वारीचे प्रस्थान हे तरडगाव येथे होईल. तिथे दिघोडा येथील अक्षय महाराज कोळी हे कीर्तन करतील. मंगळवारच्या फलटण निवासी करंजा येथील अक्षय महाराज कोळी यांची कीर्तन सेवा पार पडेल. बुथवारी धरड इथल्या मुक्कमात गणेश महाराज आणि नामदेव महाराज यांचे प्रवचन आणि करंजा येथील अक्षय महाराज यांचे कीर्तन पार पडेल. गुरुवारी नातेपोते येथे पालखीचे प्रस्थान असेल. तिथे नांदेड येथील कीर्तनकार नामदेव महाराज जायेभाये यांची कीर्तनसेवा पार पडेल. शनिवारच्या वेळापूरच्या मुक्कामात सातारा येथील चांबरे महाराज यांचे कीर्तन होईल. रविवारी शेगाव मुक्कामात राजेंद्र महाराज केंद्रे यांचे कीर्तन होईल. सोमवारच्या वाखरी येथील मुक्कामात नितीन महाराज म्हात्रे यांचे कीर्तन पार पडेल. मंळवारी पंढरपूर निवासी उरणमधील बुजूर्ग कीर्तनकार देवजी महाराज बाबर केळीवाले यांचे कीर्तन होईल. आषाढीच्या एकादशीचं विठ्ठल दर्शनानंतरचे कीर्तन राजेंद्र महाराज केंद्रे करणार आहेत. गुरुवारी द्वादशीच्या क्षिरापतीचे कीर्तन सकाळ 9 वाजता नितीन महाराज म्हात्रे करतील आणि प्रसादानंतर वारकरी उरणला परततील.

उरणमधून निघणार्‍या या वारीला उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांचे बहुमोल सहकार्य असतं. याशिवाय चंद्रकांत घरत, नारायण भोईर, किसन म्हात्रे, सतीश भोईर, पंडित घरत, कमलाकर पाटील, गणेशनाथ महाराज अशा असंख्य दानशुरांकडून सहकार्य मिळत असल्याचे नितीन महाराज आणि राजेंद्र केंद्रे महाराज यांनी सांगितले.

Exit mobile version