| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ आणि नेरळ परिसर वारकरी मंडळ यांच्या वतीने दिंडी काढण्यात आली.एकादशीनिमित्तमधील श्री हनुमान मंदिर येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वारकरी मंडळाने केले होते. आषाढ वद्य कामीका एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात पहाटे पासून धार्मिक कार्यक्रम सुरू होते.काकडा नंतर सकाळी गणेश पूजन, हनुमान पूजन, दीप पूजन, कलश पूजन, माऊली पूजन,तुळशी वृंदावन पूजन विणा पूजन आदी वारकरी मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. नेरळ वारकरी मंडळाचे हभप सर्वश्री रामदास साळुंखे, पद्मा थोरवे, माई राणे, शरद गवळी, शांताराम पळसकर, काशिनाथ ठमके, शर्मा शिंगवे, नगो गवळी आणि लक्ष्मण हजारे यांनी पायी दिंडीचे नियोजन केले होते.
यावेळी नेरळ गावामध्ये नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी काढण्यात आली.हनुमान मंदिर येथे सुरू झालेली दिंडी तुकाराम महाराज चौक, हुतात्मा हिराजी पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी स्टेशन रस्त्याने हुतात्मा भाई कोतवाल चौक अशी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने खांडा येथे पोहचली. तेथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पायी दिंडी विसावली. श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान कडून दिंडीचे यथोचित स्वागत करण्यात आले. तर तेथून पायी दिंडी मोहाची वाडी येथील श्री साई देवस्थान येथे पोहचली. तेथे देवस्थान ट्रस्टचे काशिनाथ ठमके, अविनाश भगत,चींधू बाबरे, मुरकुटे यांनी स्वागत केले. तेथून गणेश घाट मार्गे ही पायी दिंडी कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्याने हभप लक्ष्मण हजारे यांच्याकडे विसावली. शेवटी तेथून माथेरान नेरळ रस्त्याने श्री गणेश मंदिर हेटकर आली येथून चेडोबा मैदान अशी हनुमान मंदिरात आली. तेथे हभप नरेश महाराज पाटील यांचे हरी कीर्तन सादर झाले.
या पायी दिंडीत भजन संध्येत विजय महाराज पाटील,नरेश महाराज पाटील,विवेक मंगेश पालांडे, गोटिरान कडू, तानाजी खंबाले, रुपेश हिलाल, मधुकर लदगे, अनंता आग्दाणे, रघुनाथ मोहिते, तळेकर महाराज, शिवराम महाराज तुपे, पंढरीनाथ मनवे, दीपक मनवे, नथुराम घडागे, सुनीता राणे, कल्पना घाटे, सोपान ऐंकर,नथुराम घडगे यांची साथ मिळाली तर मृदुंगमनी म्हणून बळीराम गायकर,गणेश पाटील, लहू म्हसकर, जयेश राणे, संदीप मोडक, दत्ता मोहिते, मनोहर पाटणकर,चोपदार म्हणून लक्षणं मिसाळ, बळीराम सोनावळे यांनी आणि वारकरी यांची साथ लाभली.