| रेवदंडा | प्रतिनिधी |
निसर्ग सोशल ग्रुपच्या स्तुत्य उपक्रमाने चौल भाटगल्ली डोंगरावर बीज वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला, निसर्ग सोशल ग्रुप सदस्यासह युवावर्ग, विविध संस्था व चौल ग्रामस्थ, मित्रमंडळ यांच्या मोठा सहभागाने बीज वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
बीज वृक्षारोपण कार्यक्रमास ओंकार नाईक, शैलेश राईलकर, रविंद्र पाटील, माधुरी टेकाळकर, स्वराज नाईक, नैनेश नाईक, अतुल गुरव, राकेश काठे, आदीच्या सहकार्याने अंदाजे 1500 बिया उपलब्ध करण्यात आल्या होत्या, यामध्ये चिंच, आंबा, फणस, कोकम, कंरज, मोह व आणखीन इतर बियाचा समावेश होता. या वृक्षारोपण कार्यक्रमांस सकाळी दहा वाजता सुरूवात करण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व युवावर्गाने श्रमदानातून ठिकठिकाणी खड्डे करून बीज वृक्षारोपण केले. चौल भाटगल्ली डोंगर परिसरात करण्यात आलेल्या बीज वृक्षारोपणचे योग्य प्रकारे संगोपन निसर्ग संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल असे राकेश काठे यांनी म्हटले.