एटीएमची अदलाबदल करून बावन्न हजारांची फसवणूक

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

एटीएम कार्डची अदलाबदली करून 52 हजार 22 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.20) गुन्हा दाखल करण्यात आला.

साधना बोहरा या तक्का गाव येथे राहत असून, मंगळवारी त्या रोख रक्कम काढण्यासाठी घरातून पायी निघाल्या. त्या रेल्वे स्टेशन जवळील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता, दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले आणि एटीएम खराब आहे असे बोलून त्यांनी एटीएम कार्ड हातातून घेतले. आणि नकळत एटीएम कार्डची अदलाबदली करून त्याच्या जवळील एटीएम कार्ड बोहरा यांना दिले. आणि तेथून ते निघून गेले. त्यानंतर त्यांनी ओळखीच्या व्यक्तीला एटीएम देऊन पैसे काढण्यास सांगितले. मात्र एटीएम मधून पैसे आले नाहीत. यावेळी त्यांच्या मोबाईल नंबरवर पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर बँकेत जाऊन त्यांनी स्टेटमेंट काढून पाहिले असता 52 हजार 22 रुपये काढण्यात आल्याचे समजले.

Exit mobile version