| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथे राहणारी व्यक्ती आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघुन गेल्याची घटना घडली आहे. याबबत ही व्यक्ती हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नवीन पनवेल सेक्टर 5 येथे राहणारे मनोज बापू देशमुख यांनी क्रेडिट कार्डवर लोन घेतले होते. हे घेतलेले लोन परत करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे घरामध्ये कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले. परंतु, मनोज हे पुन्हा घरी परतलेच नाही. यामुळे ते हरवले असल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. मनोज देशमुख यांची उंची 5 फूट 6 इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ, अंगात अबोली रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट घातली आहे. त्यांच्याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.