• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वादळाशी झुंज! जाळ्यांसह बोटींचे नुकसान

Krushival by Krushival
August 27, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
वादळाशी झुंज! जाळ्यांसह बोटींचे नुकसान
0
SHARES
115
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । प्रतिनिधी ।

बेकायदा मासेमारी, माशांचा प्रजनन कालावधी असल्याने मच्छीमार बांधवांनी 15 ऑगस्टनंतर मासेमारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मासेमारीला मोठ्या उत्साहात सुरुवात केल्यावर अवघे 10 दिवस होत नाहीत, तोच वादळी वार्‍यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. समुद्रात अचानक सोसाट्याचा वारा आल्याने काही बोटी शनिवारी तर उर्वरित रविवारी पहाटेच्या सुमारास किनार्‍यावर परत आल्या. वार्‍यामुळे काही जाळी फाटली असून बोटींनादेखील हानी पोहोचली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा मच्छीमार बांधवांकडून केला जात आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट घोंघावू लागले आहे.

पश्‍चिम किनार्‍यावर पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी हा 1 ऑगस्टपर्यंत असतो, मात्र मत्स्य प्रजनन काळ पाहता मासेमारीसाठी 15 ऑगस्टला बहुतांशी बोटी निघाल्या. ज्यामुळे समुद्रात माशांचे प्रमाण अधिक दिसून आले व आर्थिक उलाढाल चांगली होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे शनिवारी वादळाशी झुंज द्यावी लागली. मासेमारी जाळ्या, बोटींचे स्टेअरिंग व अन्य वस्तूंचे नुकसान सहन करावे लागले. बोटी किनार्‍यावर येताच घरातील सदस्य, कामगारांनी जाळ्या व सर्व साहित्य बोटींमधून बाहेर काढले. आता जाळी दुरुस्त करण्यासाठीचे काम सुरू केले जाणार आहे. वादळाचा इशारा असल्याने हवामान सुधारल्यावर पुन्हा मासेमारीसाठी बोटी प्रवास करणार आहेत.

यंदा माशांचे प्रमाण चांगले असल्याने पापलेट, मुशी, सुरमई, बोंबील, कोळंबी, वाघूळ, हलवा, घोळ, दाढा, रावस मासे मिळत आहेत, मात्र वादळामुळे पदरी निशारा पडली आहे.यंदा पापलेटचा साठा काही वर्षांपासून पापलेट दुर्मिळ झाले आहे. समुद्रातील या माशाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या हंगामात व्यवसायावर परिणामदेखील दिसून आला, परंतु यंदा मासेमारी करताना पापलेटचे मुबलक दर्शन समुद्रात झाले, परंतु हवामानामुळे मच्छीमारांना माघारी फिरावे लागल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मच्छीमार व्यावसायिक, खलाशी, कामगार यांच्या हाताला आलेले काम गेले आहे. एका बोटीवर कमीत कमी 14 कामगार काम करतात. यातील काही कामगारवर्ग हा परराज्यातून आलेला असतो. त्यांना अगोदर वेतनापोटी उसने पैसे दिलेले असतात. याव्यतिरिक्त बोटीवर मालक व अन्य सहकारीदेखील असतात, परंतु वादळामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.एका बोटीवर सुमारे 15 ते 16 खलाशी, कामगार असतात. रायगड जिल्ह्यातील सुमारे दोन हजार बोटींवरील 35 हजारांहून अधिक कामगारांना परतावे लागले. एका बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील मच्छीमारांचे कोट्यवधीमध्ये नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पुढचे दोन दिवस हवामान कायम राहणार असल्याने त्याचा मासेमारी, उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

माशांच्या प्रजनन काळामुळे 75 दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. आता समुद्रात बोटी गेल्यावर हवामान खराब झाल्याने वादळाचा सामना करणे शक्य नसल्याने त्या पुन्हा किनारी आणल्या. मासे चांगले मिळत असताना निराशा झाली आहे. हवामान खात्याने अगोदर पूर्वसूचना दिली, तर बरे होईल. वादळामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

सागर पेरेकर
मच्छिमार अलिबाग

Related

Tags: alibagfishfishingfishing boatfishing manindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

थरार…शिस्त, संयम आणि विश्वास

Next Post

वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
Next Post
वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?