दुचाकीला लागलेल्या धडकेतून मारामारी

सहा जखमी; सात जणांवर गुन्हे दाखल


। नेरळ । प्रतिनिधी ।

चिंचवली गावातील दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक देऊन नुकसान केले. त्यानंतर त्या नुकसानीची भरपाईसाठी कर्जत चारफाटा येथे बोलावण्यात आले. चार फाटा येथे गेल्यावर मध्यस्थी किरण बोराडे यांच्यासोमर हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. त्यानंतर ही भांडणे चिंचवली गावात पोहोचली आणि रात्री चिंचवली गावात दगड तसेच लाठीकाठ्या यांच्या सहाय्याने मारहाणीची घटना घडली आहे. दरम्यान, या मारहाणीमध्ये सहा जण जखमी झाले असून, सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिंचवली गावातील समीर हरिश्‍चंद्र मिणमिने यांच्या दुकानासमोर नागेश कोळंबे यांच्या दुचाकीला अनोळखी चारचाकी गाडीची धडक लागली. त्यावेळी अक्षय बुंधाटे याने मोटारसायकल चालक नागेश कोळंबे यास मोटारसायकल नुकसानीची भरपाई करुन द्यायला सांगतो, असे सांगून साक्षीदार किरण बोराडे यांनी चारफाटा कर्जत येथे बोलावून घेतले. तेथे अक्षय बुंधाटे याने त्याचे गाडीतून हॉकी स्टीक घेऊन गाडीतून खाली उतरुन मारण्यास धावून आला. सदरची भांडणे साक्षीदार किरण बोराडे याने सोडवली नंतर फिर्यादी हे चिंचवली येथे त्यांचे दुकानाजवळ गेले असता तेथे आरोपी क्र.1 हा मागोमाग त्याचे ताब्यातील गाडीतुन फिर्यादीच्या दुकानात समोर आला नंतर तेथे आरोपी क्र. 02 व 03 हे सुध्दा हातात काठी व चॉपर घेवुन आले व त्यांनी संगनमत करुन पैश्याच्या वादावरुन फिर्यादी याचे हातावर उपट मारली तेथे भांडणाचा आवाज ऐकुन फिर्यादी यांचा मेव्हुना नरेश बुधाटे व पत्नी वृषाली मिणमिणे फिर्यादी यांचा मुलगा चिराग हे आले. त्यांना सुध्दा हातावर उपटी मारुन दुखापत केली तसेच आरोपी क्र 2 याने त्याचे हातातील काठीने फिर्यादी याचा भाऊ सोमनाथ मिणमिणे यास डोक्यावर मारुन दुखापत केली. आरोपी क्र 3 याने चॉपरने फिर्यादी यांचा मेव्हुना नरेश बुंधाटे याचे डोक्यात मारुन दुखापत केली तसेच फिर्यादी यांचा मुलगा चिराग याचे डोक्यात पाठीवर मारुन दुखापत केली.

तर चिंचवली गावी रात्री अविनाश ज्ञानेश्‍वर बुंधाटे आणि अक्षय ज्ञानेश्‍वर बुंधाटे यांच्या डोक्यात तसेच हातावर उजव्या खांद्यावर दगड आणि लाठीकाठ्या यांच्या मदतीने दुखापत केली. त्यावेळी समीर मिनमिने, नरेश बुंधाटे, जयेश बुंधाटे, चिराज समीर मिनमिने, सोमनाथ मिनमिणे यांनी मारहाण केली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत. या दोन्ही घटनात अविनाश बुंधाटे, अक्षय बुंधाट, समीर मिणमिने, नरेश बुंधाटे, वृषाली मिनमिने, चिराग मिनमिने हे सहा जण जखमी झाले आहेत. तर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version