। पनवेल ।प्रतिनिधी ।
पळस्पे येथे कारने दुचाकीला धडक दिली. यात 43 वर्षीय व्यक्ती जखमी झाली. राजेश कांबळे असे जखमीचे नाव असून ते पळस्पे येथे राहतात. ते आपल्या बिल्डिंगसमोर दुचाकीवर थांबले होते. याचवेळी मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी कारचालक भूषण रमेश गायकवाड यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







