। पनवेल । प्रतिनिधी ।
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तीस वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जखमी केले. या प्रकरणी तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तन्मय शेजवळ हे करंजाडे येथे राहत असून सोसायटीमध्ये असताना खेमचंद आणि दिनेश चौगुले यांच्यात वाद सुरू होता. दिनेश चौगुले याने त्यांच्या हेल्मेट फेकून मारले. यावेळी तन्मय आणि त्यांची होणारी पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी दिनेश चौगुले याने त्यांच्या पत्नीला केसांना ओढून बाजूला केले आणि दिनेश याच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला हाताबुक्क्याने मारहाण केली. यावेळी होणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता दिनेश चौगुले याने धारदार शस्त्राने तन्मय यांना भोसकले. यात तन्मय जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल असता, चौगुलेने रुग्णालयात येत आईला बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी चौगुलेला अटक केली आहे.







