। पुणे । प्रतिनिधी ।
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (दि.17) रात्री भारतीय हवाई दलाचे (IAF) एका लढाऊ विमान क्रॅशलाईन झाले. या घटनेमुळे विमानतळाची धावपट्टी सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरती बंद करण्यात आली. पुणे विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद झाल्यामुळे नागरी विमानांचे उड्डाण आणि आगमन ठप्प झाले होते. त्यामुळे पुण्यात येणारी किमान आठ विमाने विविध शहरांकडे वळवण्यात आली. ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. सुदैवाने, या घटनेत विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती हवाई दलाकडून मिळत आहे.







