|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
शाळेतील व्हॅन मधील चालकाने विद्यार्थीनी सोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . सारळपुल ते चोंढी दरम्यान ही घटना व्हॅनमध्ये घडली. याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अलिबाग तालुक्यातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे शाळेच्या खासगी व्हॅन मधून बुधवारी ( दि. 15) प्रवास करत होती.सारळ पूल ते चोंढी दरम्यान 52 वर्षीय चालकाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यासोबत अश्लील वर्तन केले .या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी किहिम मधील एका दुकानदाराने अल्पवयीन मुलीशी दुकानात अश्लील वर्तन केल्याची घटना घडली होती . त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
आरोपीला अटक करण्यात आले असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.





