• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भातशेतीला उतरती कळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
भातशेतीला उतरती कळा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडमध्ये 28 हजार हेक्टर क्षेत्र घटले; हवामान बदलाचा मोठा परिणाम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वाढते शहरीकरण, सिडकोकडून संपादित गावे, एमआयडीसी अंतर्गत घेतली जाणारी जमीन, मजुरांची कमतरता, भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न आणि झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण या विविध कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र सातत्याने कमी होत चालले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत शेती क्षेत्रामध्ये मोठी घट झाली असून, तब्बल 28 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र घटल्याची माहिती समोर आली आहे. या बदलाचा थेट परिणाम जिल्ह्यातील शेती व्यवस्थेवर होताना दिसत आहे.

पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. विविध प्रकल्पांच्या नावाखाली एमआयडीसीमार्फत मोठ्या प्रमाणात जमीन संपादीत केली जात असून, त्याचबरोबर नागरीकरणही वाढत आहे. या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणून शेती क्षेत्रात मोठी घट होत आहे.

एकेकाळी सुमारे 1 लाख 24 हजार हेक्टरवर असलेले भातशेतीचे क्षेत्र प्रथम 95 हजार 645 हेक्टरपर्यंत कमी झाले आणि नंतर ते आणखी घटून सुमारे 78 हजार हेक्टरपर्यंत आले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळख असलेला हा जिल्हा आता औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढत असल्याने भातशेतीच्या जमिनीवर हॉटेल्स, कॉटेजेस आणि रिसॉर्ट्स उभारले जात आहेत. श्रीमंत गुंतवणूकदारांकडून शेतजमिनी खरेदी करून फार्महाऊस उभारण्यावरही भर दिला जात आहे. परिणामी, शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. सेझ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, टाटा पॉवर यांसारख्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 450 हेक्टर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी 28 हेक्टर, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी 4 हजार हेक्टर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी 10 हेक्टर, बाळगंगा धरण प्रकल्पासाठी 1 हजार 213 हेक्टर, खालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा 2 साठी 9 हेक्टर व टप्पा 3 साठी 2 हेक्टर, नवी मुंबई विमानतळासाठी 684 हेक्टर, रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी 31 हेक्टर, वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी 318 हेक्टर आणि पुणे दिघी रस्त्यासाठी 4 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे.

सिडकोच्या माध्यमातून अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील 44 गावांमध्ये एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी 10 हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, अलिबागसह श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्यामुळे हजारो हेक्टर जमीन नापिक होत आहे. अनेक ठिकाणी भातशेतीच्या जमिनींवर कांदळवने निर्माण झाली आहेत. हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान यांचाही शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. याशिवाय मजुरांची कमतरता, सिंचन सुविधांचा अभाव आणि शेतीतील यांत्रिकीकरणाची कमी पातळी यांसारख्या कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्र आणखी घटत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Related

Tags: farmfarmerfarmingImpact of climate changeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRice cultivationsocial news
Previous Post

शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
उरणमध्ये 76.94 कोटींची पाणीपट्टी थकबाकी
उरण

उरणमध्ये 76.94 कोटींची पाणीपट्टी थकबाकी

April 17, 2026
सुधागड तालुक्यात घरगुती गॅससाठी रांगा
रायगड

सुधागड तालुक्यात घरगुती गॅससाठी रांगा

April 17, 2026
रायगड

बोर्लीपंचतन शाळेत अज्ञातांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड

April 17, 2026
क्राईम

खोपोली परिसरात सायकल चोरांचा सुळसुळाट

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?