समृद्धी महामार्गावर हाणामारी; चार गंभीर जखमी

| बुलढाणा | वृत्तसंस्था |

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर पेट्रोल पंप चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या दुसरं बीड समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर हा संपूर्ण प्रकार घडला असून यात पेट्रोल पंप चालकाने टोल कर्मचाऱ्यांवर चक्क रिव्हॉल्व्हर रोखल्याचे दृश्य टोल नाक्यावर लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंप चालकाने आपल वाहन विरुद्ध दिशेने घेऊन जाण्याचा आग्रह केल्याने ही हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात पेट्रोल पंप चालकाने टोल कर्मचाऱ्यांवर चक्क रिव्हॉल्व्हर रोखल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर झालेल्या हाणामारीच्या या घटनेत चार जण गंभीर जखमी झालेची माहिती समोर अली आसून जखमींवर सध्या जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संपूर्ण हाणमारीची घटना टोल नाक्यावर लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

Exit mobile version