दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडीत रहिवासी असणारे शेतकरी जयकांत महादेव भायदे यांच्या मालकीच्या चार म्हशी व एका गायीचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुरुड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याची प्रत मुरुड तहसीलदारांनाही देण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नौशाद दळवी, शहरप्रमुख आदेश दांडेकर, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, प्रशांत कासेकर, राहुल कासार, बाळकृष्ण गोंजी, दिपाली जामकर, अमिर खानजादा आदींसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात अनेक ठिकाणी वीजवाहिनीखाली सुरक्षित जाळ्या बसवलेल्या नाहीत.विद्युत पोलावर तारा लोंबताना दिसत आहेत .पोल झुकलेले अवस्थेत आहेत. दुसरे महत्वाचे म्हणजे जीर्ण वाहिनीचे पेट्रोलिंग करणे गरजेचे असते. याकडे ही गांभीर्याने महावितरण कंपनी पाहाताना दिसत नाही. दोन महिन्यापूर्वी मारुती नाक्यावर देखील विद्युत डीपीला स्पर्श झाल्याने गायीला शॉक लागून मृत्यू झाला होता. यांचा गांभीर्य आजुन पर्यत महावितरण कंपनीने घेतले नाही. फक्त निष्काळजीपणा हेच दिसून येत आहे. भायदे कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करत राहणार, असा इशारा आदेश दांडेकर यांनी दिला.

Exit mobile version