अभिनेत्री कंगनावर एफआयआर दाखल करा

कर्जत काँग्रेसची मागणी
। कर्जत । वार्ताहर ।
अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतीच एका वृत्तवाहिनी वरील एक कार्यक्रमात प्रकट मुलाखत दिली. सदर मुलाखती मध्ये कंगना राणावत हिने आक्षेपार्ह वक्तव्य करून स्वतंत्र सैनिकांचा अपमान केला आहे. तिच्या विरोधात एफआयआर दाखल करावी अशा मागणीचे निवेदन कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले.
सदर मुलाखती मध्ये कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या लढ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून असंख्य स्वातंत्र सैनिकांचा जाहिर अपमान केला आहे. कंगनाने देशाला 1947 साली स्वातंत्र मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाल खरे स्वातंत्र 2014 साली मिळाले असे विधान करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या स्वातंत्र सैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे.
तरी कंगना राणावत हिच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करून योग्यती कार्यवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना दिले. याप्रसंगी माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्‍चंद्रे, सुभाष मदन, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version