। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संमतीशिवाय अनधिकृतरित्या रुमचा ताबा घेणार्या एका महिलेविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11 रोजी ते दि.18 जुलै 2021 या दरम्यान एका महिलेने फिर्यादी यांच्या डी.के.टी. शाळेजवळ चेंढरे अलिबाग यांच्या मालकीच्या उत्कर्ष वास्तु प्लॅट नं.303, यामध्ये फियार्दी यांचे संमतीशिवाय अनाधिकृतपणे प्रवेश करून गृह अतिक्रमण केले होते. याबाबत घरमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलीस ठाणे येथे सदर महिले विरोधात भा.दं.वि.क.448 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार श्री.झीराडकर हे करीत आहेत.