बांधकाम साहित्य चोरणार्‍यांवर गुन्हा दाखल

भुरटया चोरांमुळे आवासकर त्रस्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आवास गावात शासकीय तसेच खाजगी बांधकामांसाठी आणलेले बांधकाम साहित्य चोरणार्‍यांना रोखल्यामुळे संतापून दोघाजणांनी फावड्याच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपी कुणाल कमलाकर थळे आणि निखील सुरेश राउल यांच्या विरोधात मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अशा प्रकारच्या भुरट्या चोर्‍यांना आवासमधील ग्रामस्थ कंटाळले असल्याचे सुरज गव्हाणकर यांनी सांगितले आहे.

फिर्यादी सुरज आणि सौरभ प्रभाकर गव्हाणकर यांचे आवास सुरेखारमळा येथे कॉटेजचे काम चालू आहे. ते आपल्या आवास गावातुन घरी सुरेखारमळा येथे मोटार सायकलवरून जात असताना आवास गावच्या पारकरांच्या घराच्या वळणावर समोरून गावातील निखील सुरेश राउल व कुणाल कमलाकर थळे हे त्यांच्या मोटारसायकलवरून खडीची पोती घेवुन येत होते. त्यांना तेथे थांबविले व सांगीतले की ही माझी खडी असून माझ्या गाडीचा पाटा तुटल्याने ट्रान्सफार्मा येथे ओतलेली असल्याचे सांगितले. व ती तुम्ही घेवुन जावु नका ती माझी आहे. त्यावर ती खड़ी तुझी कशावरून आहे तुझा काय बापाची आहे का? असा प्रश्‍न करीत ती आम्ही परत घेवुन जावु असे बोलुन ते तेथुन निघून गेले. त्यानंतर गव्हाणकर सुर्यखारमळा येथे निघुन गेले व आपला भाउ सुरज यास मोटर सायकलवर घेवुन ते लाईटच्या ट्रान्सफार्मा येथे ओतलेली खडी ही निखील व कुणाल यांनी किती नेलेली आहे हे पाहण्यासाठी आले. त्याचवेळी निखील व कुणाल हे परत तेथे सफेद पोतीमध्ये खड़ी भरत असल्याचे दिसले. त्यामुळे पुन्हा त्यांना ती खडी माझी आहे ती तुम्ही नेवु नका असं सांगीतले. तेवढयात ते फोनवर बोलण्यासाठी बाजुला गेले असता त्यांचा भाऊ सुरज याच्यासोबत निखील व कुणाल यांच्यात बाचाबाची होवुन एकमेकांची हाताबुक्याने मारामारी चालु केली. सुरज हा जमिनीवर खाली पडलेला होता व त्याच्या अंगावर निखील बसुन त्यास हाताबुक्यानी मारत होता. तर कुणाल याने त्याचे हातातील फावड्याच्या दांडक्याने दोन्ही हातावर झोडी घालुन मारत होता. सदर भांडण सोडवित आपल्या भावावर उपचार करण्यासाठी सौरभ गव्हाणकर हे सिव्हिल हस्पिटल अलिबाग येथे गेले. त्यानंतर या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version