विनयभंगप्रकरणी रेल्वे प्रवाशावर गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |
रेल्वेमध्ये प्रवास करणार्‍या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रेल्वे प्रवाशांच्या विरोधामध्ये महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना रेल्वेने प्रवास करीत असताना सन 2019 मध्ये घडली होती. महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन कोकण रेल्वेच्या नेलवेली एक्स्प्रेसमधून केरळमधील एक महिला प्रवास करीत असताना, महाड तालुक्यातील वीर येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे आली असता के.वाय. तेजस (41) इल्लांजी एर्नाकुलम् केरळ याने सदर महिलेजवळ असभ्य वर्तन आणि अश्‍लील शब्द बोलल्याप्रकरणी सुरुवातीला रत्नागिरी आणि त्यानंतर पनवेल येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पनवेल येथून महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ए.एस. साळवी करीत आहेत.

Exit mobile version