| सोगाव | वार्ताहर |
देशविदेशातील पर्यटकांसह मुंबई पुण्याच्या पर्यटकांची व कलाकारांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग येथे गेले काही वर्षांत पर्यटकांची व दिग्गज कलाकारांची भेट देत आहेत. यातच चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार हे सुद्धा चित्रीकरणासाठी अलिबागच्या पर्यटनस्थळी येत आहेत. सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी किहीम समुद्रकिनारी संसारा या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार पुष्कर श्रोत्री, ऋषी सक्सेना, सायली संजीव आदी आले होते. यावेळी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकाश सप्रे, नदीम अत्तार व आदित्य कर्वे आदी उपस्थित होते.