। सिद्धी भगत ।
गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे चित्रपटगृह बंद होते. परंतु प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी आतुर होते. राज्यातील महाविकासआघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाला. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत आनंदमय वातावरण निर्माण निर्माण झाले होते. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच बॉलिवूडच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखांमुळे मराठी सिनेमांच्या तारखा बदलण्यात येत आहेत. मराठीतील मजयंतीफ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख 26 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख आठ आठवडे आधीच जाहीर करण्यात आली होती. अशातच बॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा अंतिम 26 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला येणार्या अंतिम या बॉलिवूड चित्रपटामुळे मराठीतील जयंती सिनेमाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. पण जर जयंतीने सिनेमा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असती तर नंतर मराठीतील अनेक सिनेमांनादेखील आर्थिक फटका बसला असता. त्यामुळे आता जयंती सिनेमा 26 नोव्हेंरला प्रदर्शित न होता 12 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित जयंती हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा आहे. जयंतीनंतर मराठीतील गोदावरी, झिम्मा सिनेमा प्रदर्शित होणार होते. जयंती सिनेमानंतर 19 नोव्हेंबरला झिम्मा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे. झिम्मा चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. त्यानंतर गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. गोदावरी चित्रपटगृहाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले आहे. गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मराठी सिनेसृष्टीला बसणार असुन बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात पुन्हा मराठी चित्रपत्रांची गळचेपी होताना दिसून येत आहे.