629 उमेदवारांची होणार लढत; नगराध्यक्षासाठी 34 तर नगरसेवकासाठी 596 उमेदवार रिंगणात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. 107 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यात नगराध्यक्ष पदातील उमेदवारांनी नऊ आणि नगरसेवक पदाच्या 98 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये नगरसेवकपदासाठी 595 व नगराध्यक्ष पदासाठी 34 जण अंतिम उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 629 उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.
खोपोलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सात व नगरसेवकपदासाठी 118, अलिबागमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 42. श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी 60, मुरूडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी 58. रोहामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 51. महाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवक पदासाठी 53. पेणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी 72, उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी 49. कर्जतमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी 46. माथेरानमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. या उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






