अखेर धोकादायक झाड काढले

। कर्जत । वार्ताहर ।

माथेरान घाटात वॉटर पॉईप स्टेशनजवळ सुकलेले झाड पडण्याच्या स्थितीत होते. ते धोकादायक झाड पडून दुर्घटना घडेल अशी भीती टॅक्सी युनियन चे उप अध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी केली होती.

याबाबत चे वृत्त दै. कृषीवलमध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागचे कर्जतचे उपविभागीय अभियंता संजीव वानखेडे यांनी दखल घेऊन तात्काळ ते झाड जेसीबीच्या साह्याने हटवले, त्यामुळे पुढे होणारी संभाव दुर्घटना टळली. धोकादायक झाड काढून टाकल्याने टॅक्सी युनियन चे उपअध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी उप अभियंता वानखडे यांचे आभार मानले आहेत. धोकादायक काढल्यामुळे घाटातून माथेरानकडे जाण्याचा प्रवास सुखकर होणार असल्याने वाहन चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version