अखेर हमरापूरचा पाणीप्रश्‍न सुटणार

जलजीवन अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

| हमरापूर | वार्ताहर |

पेण तालुक्यातील हमरापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ स्मिता पिंट्याशेठ पाटील व सरपंच राकेश दाभाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यामुळे परिसरातील पाणीप्रश्‍न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास स्मिता पाटील, सरपंच राकेश दाभाडे, उपसरपंच संजय पाटील, सदस्य युवराज म्हात्रे, ओमकार पाटील, रवींद्र शेदवळ, सदस्या पायल सुर्वे, पूजा पाटील, सचिन शेलार, सायली मांडलेकर, किसन मांगरुळकर, सचिन गोलीमडे, प्रदीप म्हात्रे, प्रकाश पांडुरंग भगत, कुणाल पाटील, विनोद नाईक, संदेश कदम व हमरापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

या योजनेमुळे हमरापूर ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटला जाणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version