। हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील हमरापूर विभागातून श्री गणेश उत्कर्ष मंडळ हमरापूर विभागातर्फे पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत पायी पदयात्रा काढण्यात आली.
गुरुवारी सकाळी कळवे गावातून या पायी पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, उपाध्यक्ष कृष्णा गोळीमडे, खजिनदार रवींद्र पाटील, सचिव राजन पाटील, माजी अध्यक्ष भाई मोकल, कळवे ग्रामपंचायत सरपंच सतीश पाटील, हमरापूर ग्रामपंचायत सरपंच राकेश दाभाडे, सचिन पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, कृणाल पाटील, नितीन मोकल, संदेश कदम, विनोद नाईक, नितीन मोकल यांच्यासह कळवे, जोहे, तांबडशेत, हमरापुर, दादर व अन्य गावातील मूर्तिकार मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.