| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. गेली दोन-तीन दिवसांपासून चाचपणी सुरू आहे.
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून उरण रेल्वे सुरू होईल या आशेवर उरणकर होते. परंतु, प्रत्येकवेळी उरणकरांचा भ्रमनिरास होत होता. मात्र, प्रदीर्घ काळानंतर उरण रेल्वे सेवेला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न्हावा-शिवडी अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने उरण-नेरुळ रेल्वे सेवेचाही शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. सदर उद्घाटन रिमोटद्वारे होईल. यामुळे उरणकरांना कमी वेळात मुंबईला जाणे शक्य होईल. उरण रेल्वे उद्या सुरू होणार असल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
सुरुवातीला रेल्वे बेलापूर, नेरुळ आदी ठिकाणी फेऱ्या मारणार आहेत. त्यानंतर फेऱ्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे.