| पनवेल | प्रतिनिधी |
बनावट सोने देऊन एका फायनान्स कंपनीची फसवणूक करून गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पनवेल येथील मंगल क्रेडीट ॲण्ड फिनक्रॉप फायनान्स लिमीटेड येथे आरोपी करेश सुभाष भोईर याने सोन्याच्या बनावट दोन वस्तू तारण ठेवून त्याच्यावर 1 लाख 80 हजार रुपये काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच तो वेगवगेळ्या ठिकाणी आपले अस्तित्व लवपून राहत होता. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांनी आरोपीला शोधून काढण्याचे आदेश दिले असता पोलीस उप निरीक्षक हजरत पठाण, पोना प्रविण मेथे, भास्कर चौरे आदींच्या पथकाला गुप्त बातमीदाराने आरोपी हा पनवेल शहर परिसरात आल्याची माहिती दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक, हजरत पठाण, करीत आहेत.






