| माणगाव | प्रतिनिधी |
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या उतेखोल येथील माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेतर्फे संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून आजारी सभासदाला औषोधोपचाराकरीता आर्थिक सहाय्य देण्यात आले.
माणगाव ग्रामीण पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष नुकतेच साजरा करण्यात आले. या संस्थेने अल्पवधीत गरुड भरारी घेतली आहे. या संस्थेचे सभासद शैलेश दगडू बामणे यांना नुकताच पॅरालिसिसचा आजार आला होता. बामणे यांना औषोधोपचाराकरीता सभासदांच्या कल्याण निधीतून आर्थिक सहाय्यतेचा धनादेश त्यांच्या दत्तनगर येथील निवासस्थानी जाऊन संस्थेचे चेअरमन आनंद यादव, दिलीप जाधव, नरेश राजपूत, संदीप खरंगटे, उदय म्हशेलकर, अरुण प्रभाळे व संस्थेचे व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड, राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
औषोधोपचाराकरीता आर्थिक सहाय्य
