| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल तालुका माणगाव या पतसंस्थेच्या भागधारकांची (सभासदांची) सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स निजामपूर रोड माणगाव याठिकाणी शुक्रवारी, (दि.20) सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीस उपस्थित सर्व संचालक मंडळ, भागधारक, मान्यवर मंडळी यांचे संस्थेतर्फे संचालक दिलीप जाधव व संचालक नरेश राजपूत यांनी स्वागत करून अहवाल सालात ज्ञात व अज्ञात सभासदांचे, त्यांचे संबंधितांच्या निधनाने संस्थेत पोकळी निर्माण झाली आहे त्यांना उपस्थित संचालक मंडळ व सभासद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संस्थेचे कार्यतत्पर व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले ते इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या सभेत संस्थेचे सभासद मनोज मिरजकर, रमेश मिरजकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करून संस्थेच्या भरभराटीचे व प्रगतीचे कौतुक केले. संस्थेच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनीच सातत्याने चांगल्या प्रकारे प्रयत्न केल्यानेच आपली संस्था आज नावारूपाला आली असल्याचे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सभेला संचालक दिलीप जाधव,संचालक नरेश राजपूत,संचालक उदय म्हशेलकर,संचालक दिलीप अंबुर्ले,सभासद रमेश मिरजकर,शांताराम मेकडे,मनोज मिरजकर, बळीराम मोरे, पत्रकार कमलाकर होवाळ आदींसह भागधारक (सभासद), कर्मचारी वृंद,स्वल्पबचत प्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.