| पनवेल | प्रतिनिधी |
गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि. 21) पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. पनवेलचे नाव उंचवणार्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘माझ्या स्वप्नातील पनवेल’ या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा सोहळा दुपारी 3.30 पनवेल शहरातील सुरुची बँक्वेट हॉल, सुरुची हॉटेल, कोहिनूर टेक्निकल जवळ येथे होणार आहे.
या समारंभासाठी खगोल अभ्यासक-पंचांगकर्ते दा.कृ. सोमण, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, अभिनेत्री मुग्धा गोडबोले उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी आपणही उपस्थित राहावे, असे आवाहन संपादक गणेश कोळी यांनी केले आहे.