| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील आंबोली बौद्ध समाजसेवा संघातर्फे लुंबिनी बुद्धविहार येथे वर्षावास भाद्रपद पौर्णिमा महोत्सव 2567 आयु. जनार्दन हाटे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. जनार्दन हाटे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. बौद्धाचार्य जीवन मोरे यांनी खमंग याचना देऊन आदरणीय भंते प्रज्ञानंद थेरो यांनी वंदन, त्रिसरण, गाथा पंचशील व बुद्ध धम्माच्या रितीरिवाजा प्रमाणे वंदनेस सुरुवात केली. यावेळी आंबोली गांव मंडळाकडून आदरणीय भंते यांना भोजनदान, चिवरदान, परिष्कदान करण्यात आले. यावेळी देहुबाई चा. कांबळे व प्रणिता प. मोरे यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुरुड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष नारायण दुधे, प्रवीण मोरे, विजय मोरे,रुपेश मोरे,सचीन हाटे, सुधीर हाटे, विलास कोंजिरकर, काशिनाथ कांबळे, रमेश मोरे, पांडुरंग जाधव, बाळकृष्ण मोरे यांनी आदरणीय भंते यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर अकबर पठाण, अनंत पाडगे, सलिम खान, निकिता कोंजिरकर, मेघना हाटे, कुसूम मोरे,कमल मोरे,विमल मोरे, सुरेखा तांबे, वंदना मोरे,जिविता मोरे, कांबळे मॅडम आदी मान्यवरांचादेखील पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन कोंजिरकर, अशोक कांबळे यांनी, तर महेश हाटे यांनी आभार मानले.