| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचसह सदस्य पदाच्या 35 जागांसाठी मतदान प्रक्रिया मंगळवार (दि.28) सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झाली. जिल्ह्यात सर्व ठिकाणी मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात 36.35 टक्के मतदान झाले आहे. महाड तालुक्यातील मोहोप्रे, ताम्हाणे, मुरूडमधील काशीद या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 58 ते 60 टक्के मतदान झाले. अन्य ठिकाणी 20 टक्के ते 38 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पुरुषांसह महिलांचा देखील मतदानासाठी उत्साह असल्याचे दिसून आले. या कालावधीत 5 हजार 176 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.





