। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील शिवधन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सभासद उल्हास शंकर म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. पतसंस्थेच्या सभासद कल्याण निधीमधून त्यांची वारसदार बहीण समुद्रा कृष्णा म्हात्रे यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या आर्थिक सहकार्याबद्दल म्हात्रे कुटुंबीयांनी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, गजानन वशेणीकर, विलास भगत, शाम ठाकूर, विलास ठाकूर, लिला म्हात्रे आदी उपस्थित होते.







