रायगड जिल्हा बँकेतर्फे आर्थिक, डजिटल साक्षरता अभियान

म्हसळा | वार्ताहर |

नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून नाबार्ड व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग शाखा म्हसळा यांचे वतीने महिला,शेतकरी व विद्यार्थी यांचे करीता कोव्हीड नियमांचे सर्व पालन करून आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत म्हसळा तालुक्यातील म्हसळा,जांभूळ व पाष्टी येथे मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

मेळाव्यामध्ये बँकेच्या म्हसळा शाखेचे वरिष्ठ अधिकारी मंगेश मुंडे,वसुली अधिकारी सुरेंद्र शिर्के,विजय पयेर,रमेश भोनकर,विनोद धोकटे, योगेश,संदेश पाटील यांनी आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता म्हणजे काय? व साक्षर होणे काळाची गरज असल्याबाबत महत्व सांगून दूरदृष्टी ठेवून साक्षरतेचा अधिकार करण्याचे आवाहन बचत गटातील महिला,शेतकरी व विद्यार्थी यांना सांगून आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन मुंडे यांनी केले. तसेच बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. आर्थिक व डिजिटल साक्षर होणे हि काळाची गरज आहे असे सुरेंद्र शिर्के यांच्या कडून जांभूळ येथील कार्यक्रमात सांगण्यात आले. सदर कार्यक्रम बचत गटातील महिला ,प्राथमिक शेती संस्थांचे सभासद व विद्यार्थी यांच्या सहभागामुळे यशस्वीरित्या पार पडला.

Exit mobile version