आपत्तीच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

अलिबागप्रतिनिधी


विशिष्ट कंपनीच्या फायद्यासाठी आपत्ती व्यवस्थापन युनिटने दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादारांवर अन्याय केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून या प्रक्रियेला स्थगितीत देऊन उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे रायगडचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटने बचाव किट चा पुरवठा व प्रशिक्षण सेवा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली . यापूर्वी देखील विभागाने प्रशिक्षण व उपकरणासाठी वेगवेगळी निविदा काढली होती. आता मात्र आपला मित्र कीट पुरवठा आणि प्रशिक्षणसेवा या दोन्ही भिन्न सेवांसाठी एकत्रित निविदा राबवली जात आहे .सुमारे 20 कोटी रुपयांच्या या निविदासाठी बैठक ही घेण्यात आली नाही.निविदेतील अटी व शर्ती दोषपूर्ण आहेत , असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला असून याबाबत पत्र संबंधित विभागाच्याप्रधान सचिवांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे .रायगड जिल्ह्यामध्ये अपदा मित्र 300 हून अधिक असल्याची माहिती समोर येत आहे .आपत्ती व्यवस्थापनाचा घोटाळा विरोधी पक्ष नेत्यांनी उघड केल्याने आपत्ती विभाग मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता असून वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे .


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणयांच्या संयुक्त विद्यमाने अपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम चालू होते .पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 20 जिल्हे घेतले होते .उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत .शासन स्तरावर केंद्र काढण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू आहे.त्यामुळे रायगड जिल्ह्याचा याबाबत काहीही संबंध नाही , अशी जिल्हाधिकारी कार्यालयातील खात्रीशीर सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे .

Exit mobile version