। अलिबाग । प्रतिनिधी ।
मंजूर कर्जातून जूने कर्ज पुर्ण करण्याचा बहाणा करीत बँकेतील दोघांनी 37 जणांची फसवणूक केली आहे. त्यामध्ये एका क्रेडीट व्यवस्थापकाचाही समावेश आहे. ग्राहकांकडून 13 लाख 69 हजार 691 रुपयांची आर्थिक लूट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबागमध्ये इंड्स फायनाशिअल इन्क्लुजन लिमिटेड ही खासगी बँक आहे. या बँकेतून 37 ग्राहकांचे कर्ज मंजूर झाले होते. मंजूर झालेले कर्जातील रक्कम घेण्यासाठी ग्राहक बँकेत आले. त्यावेळी बँकेतील क्रेडीट व्यवस्थापकासह दोघांनी जूने कर्ज पुर्ण करण्यास सांगून त्यांच्याकडील सुमारे 13 लाख 69 हजार 691 रुपये लंपास केले. ही बाब ग्राहकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अलिबाग पोलिसा ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फर्णे अधिक तपास करीत आहेत. दोन्ही आरोपीपैकी एक आरोपी व्यवस्थापक व दुसरा आरोपी कॅशिअर असून ते नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही पसार झाले असून बँकेने त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांना बडतर्फ केले असल्याचेही सांगण्यात आले आहे.