स्टील मार्केटमधील एसी कंटेनरला आग

। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली स्टील मार्केट येथील भंगारात असलेल्या एका कंटेनरला अचानकपणे आग लागल्याची घटना बुधवारी (दि.9) घडली आहे. सदर आगीच्या लपेटण्यात आजूबाजूची झाडे आल्याने वृक्षराईचे मोेठे नुकसान झाले आहे. सदर आगीमुळे परीसरातील लोकांची धावपळ झाली व त्यांनी तातडीने अग्नीशमनदलाला पाचरण करुन त्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आगीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version