भाजपा कार्यालयाला आग

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पॉईंट भागात प्रदेश कार्यालय आहे. या कार्यलयातून राज्यभरातील भाजपा संघटनेचे काम पाहिले जाते. रविवारी सुट्टी असल्यामुळे कार्यालयात डागडुजीचे काम सुरू होते. यावेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले गेले. रविवार असल्यामुळे इतर कर्मचार्‍यांना सुट्टी असली तरी सोशल मीडियाचे काम करणार्‍या टीममधील काही लोक कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राुहल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून, कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही.

Exit mobile version