अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील धोकवडे आयडीबीआय बँकेच्या शाखेला आज शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बँकेचे फर्निचर जळून नुकसान झाले आहे. सकाळी आठ च्या सुमारास ही घटना घडली. बँकेत आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच आरसीएफ च्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
आरसीएफ च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहचत सदर आग आटोक्यात आणली. या आगीत बँकेच्या फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने बँक कामकाज सुरू व्हायच्या काही तास आधी दुर्घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला आहे.