कल्याणच्या उत्पादन शुल्क कार्यालयाला आग

fire isolated over black background

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याण शहरातील सिंडिकेट परिसरात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला मध्यरात्री शुक्रवारी (दि.25) भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे तसेच फर्निचर जळून खाक झाले.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, संगणक, फर्निचर तसेच अन्य साहित्य आगीत खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही आग इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याच अंदाज महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान या आगीमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती.

Exit mobile version