पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील ताकई-अडोशी ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कपंनीत आग लागून कंपनीतील मशीनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीने रौद्ररूप धारण केले. मशीनवरील कारागीराला समजल्या नंतर त्याने सर्व कामगारांना बाहेर काढले. अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल, टाटा स्टील अग्निशमन दल, आलाना अग्नी शमन दल, जेएसडब्लू अग्निशमनदल तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहचून दोन तासाच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचे लाखोचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.

Exit mobile version