तळोजा एमआयडीसीत आग

पनवेल | वार्ताहर |
तळोजा एमआयडीसी येथील केमिकल पावडर साठा असलेल्या मोकळ्या गोडाऊनला आग लागल्याने वावंजे परिसरातील जनतेमध्ये घबराट पसरली होती. तळोजा एमआयडीसीमधील वावंजे येथील केमिकल पावडर साठा असलेल्या मोकळ्या गोडावूनला आग लागली. त्यामुळे मोठ्या वावंजे परिसरातील जनतेमध्ये मोठी घबराट पसरली होती. सदरची आग अग्नीशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. यावेळी सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, संदीप कर्डीले, पो.हवा. डी.डी.पाटील, सरपंच तांडेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version