चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

। मुंबई । प्रतिनिधी ।

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर ही आग लागली असून, घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून आतापर्यंत दोन कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

Exit mobile version