। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडी तालुक्यातील राहनाळ परिसरातील भीषण आग लागली. या घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली आहेत. तसेच, या गोदामात ठेवलेले प्लायवूडही पूर्णतः जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. आगीच्या आसपास रहिवाशी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भीषण! भिवंडीत फर्निचर गोदामाला आग
