। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील बोरी नाका येथील दत्ता रहालकर मैदानाच्या बाजूला असलेल्या लाकडी गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. शहरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.
उरणमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील रमझान यांच्या मालकीच्या अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. त्यांनतर पुन्हा आज लाकडी गोदामाला आग लागली. याबाबत शासकीय यंत्रणा आर्थिक साटेलोटामुळे कुचकामी ठरताना दिसत आहे. त्याचे दुष्परिणाम भविष्यात उरणकरांना निश्चितच भोगावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी एका चुकीमुळे उरण शहर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही. तरी प्रशासनाने याची खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे.