ओएनजीसीमध्ये भीषण आग

| उरण | दिनेश पवार |
उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनार्‍यानजीक असलेल्या  ओएनजीसी प्रकल्पाला गुरुवारी (31 मार्च)  मोठी आग लागल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.
ही ड्रेनेज मधील तेल ज्या पाण्याच्या साठवण तलावामध्ये साठविण्यात येत आसलेल्या तलावाला आग लागली आहे. सदर आगीवर आग्निशमन दलाला  नियंत्रण मिळवण्यात यश आले आसले तरी परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही आग लागल्याचे कळताच ओएनजीसीच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्याचा शर्थीने  प्रयत्न सुरु केला.अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.सुदैवाने काही जिवीत हानी झालेली नसली तरी काम करणारे कामगार जखमी झाल्याचे समजते. मात्र त्याबात अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.आग लागल्याने धुराचे मोठमोठे लोट हवेत पसरले होते.त्यामुळे तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते.यापूर्वीही आगीच्या अशा घटना घडलेल्या आहेत.त्यात अनेक कर्मचार्‍यांना जीव गमवावा लागला आहे.आगीबाबात अधिकृत माहिती देण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाकडे वारंवार विचारणा करुनही योग्य ती माहिती दिली गेली नाही. जखमी झालेल्या कामगारावर ओएनजीसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version