| पनवेल । वार्ताहर ।
कोरोनामुळे दोन वर्षे फटाक्यांची निर्मितीवर परिणाम झाला होता. अशातच दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणामुळे शासनाने विविध निर्बंधही टाकले आहेत. त्यामुळे फटाका निर्मितीवर त्याचा परिणाम झाला असून यंदा दिवाळीत विक्रीसाठी फटाके जास्त प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याने दिवाळीत फटाके महाग होण्याची शक्यता आहे.
दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे फटाके वितरक आणि फटाका विक्रेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दिवाळीसाठी पनवेल, खारघर, नवी मुंबई, परिसरातील फटाके विक्रेते वाडा, ठाणे, भिवंडी आणि मस्जिद बंदर येथून फटाके खरेदी करून फटाका विक्री करतात. मात्र, यंदा फटाक्यांची निर्मिती कमी झाल्यामुळे फटाका स्टॉल विक्रेते वितरकांच्या शोधात आहेत. मात्र बाजारात फटाकेच उपलब्ध नसल्याने यंदा विक्रीसाठी कमी प्रमाणात फटाके उपलब्ध होणार आहे. दरम्यान पनवेल शहरात महानगरपालिकेमार्फत फटाके विक्री करणार्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.