वाहतूक कोंडीसह अपुर्या पत्त्यामुळे विलंब
| दीपक घरत | पनवेल |
पनवेलच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गोदाम उभारली जात आहेत. या कामा दरम्यान आगी लागण्याच्या घटना देखील घडत आहेत. मात्र या परिसरात सक्षम अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसल्याने आजूबाजूच्या वसाहती मधील अग्निशमन दलाना घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे.
मुंब्रा – पनवेल महामार्गावर होणार्या वाहतूक कोंडीचा सामना अग्निशमन दलाच्या वाहनाना करावा लागतो तर दुर्घटना घडल्या नंतर गोदामाचे पत्ते व्यवस्थित सांगीतले जात नसल्याने अग्निशमन केंद्रातून वेळेत निघून सुद्धा घटना स्थळी पोहचण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना विलंब होत आहे. पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग अ मधील धरणा गावात सध्या एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामादरम्यान प्रकल्प परिसरात असलेल्या गवताला आग लागल्याने घटनेची माहिती कळंबोली अग्निशमन दलाल देण्यात आली.
12 वाजून 19 मिनीटांनी मिळालेल्या माहिती नंतर केवळ एकाच मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी जाण्यासाठी अग्निशमन केंद्रातून रवाना झाले. मात्र या वेळी मुंब्रा – पनवेल महामार्गावर रोडपली सर्कल तसेंचज तळोजा येथे लागलेल्या वाहतूक कोंडीमुळे आठ किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहणाला अर्ध्या तासा पेक्षा जास्तचा कालावधी लागला त्यातच घटनेची माहिती देणार्याला घटना स्थळाचा पत्ता व्यवस्थित सांगता न आल्याने 12 वाजून 20 मिनिटाने निघालेले अग्निशमन दलाचे वाहन घटना स्थळी जवळपास एका तासाने घटना स्थळी पोहचल्यावर लागलेली आग शांत झाली होती.
नवी मुंबईचे वाहन घटनास्थळी
आगीच्या घटनेची माहिती देणार्याने दिलेल्या अर्धवट माहितीमुळे घटनेचे गांभीर्य ओळखून घटनेची माहिती नवी मुंबई अग्निशमन दलाला देखील देण्यात आली. कळंबोली सिडको अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचताच काही मिनिटातच विजलेली आग विजवण्यासाठी नवी मुबंई अग्निशमन दलाचे वाहन देखील घटना स्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.