। उत्तरप्रदेश । वृत्तसंस्था ।
सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहालजवळ गोळीबारा झाल्याची घटन घडली आहे. रविवारीआग्रा विमानतळ उडवून टाकण्याचा ई- मेल आला व सोमवारी ताजमहाल परिसरात गोळीबार झाला असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गोळीबाराची घटना ही आग्रा येथील अमरूद टीला पोलीस बॅरिकेडिंगच्या परिसरात घडली. दोन तरुण दुचाकीवरून अमरूद टीला येथील ताजमहालच्या पश्चिमेकडील पार्किंगजवळ पोहोचले. बॅरियरजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या तरुणांच्या दुचाकीवर मथुराचा क्रमांक होता. या घटनेनंतर पर्यटक व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या.
ताजमहाल उडवण्याचा ई-मेल येणे व दुसऱ्यादिवशी तेथे गोळीबार होणे ही चिंतेची बाब आहे. ताजमहालसारख्या संवेदनशील ठिकाणाजवळ अशी घटना घडल्याने आग्रा येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच हवाई गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.







